आपली
शिक्षणपद्धती याविषयी बोलायचे झाल्यास शाळेचे दिवस आठवू लागतात. पण जसजसे आपण मोठे होतो, थोडे थोडे समजायला लागते. खरेतर तेव्हापासून आपल्याला
शिक्षणाला सुरुवात होते. पण प्रगतीपुस्तकावरील गुणांवरून आपल्याला
हुशार आणि ढ ठरवणा-या संस्कृतीत आपण रुळतो आणि स्वतःला ओळखण्याची
संधी गमावून बसतो. असे का होते? नेहमी पास
की नापास या चक्रात आपण का अडकतो? आपण आपल्यातील कौशल्यांची पारख
करायला टाळाटाळ का करतो? स्वतःवर विश्वास नसतो म्हणून? याचे उत्तर
आपण शोधलेच पाहिजे.
बालपणाच्या अवखळपणातून सावरत आपण प्रत्येकजण आपली वेगळी ओळख शोधत असतो. एकदा आपली स्वतःची अशी वेगळी ओळख सापडली, की आपण ती ओळख सतत आव्हान देणा-या या जगात टिकवायला हवी. जगण्यासाठी धडपडताना आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहताना आशेचा किरण घेऊन आलेली ही आपली ओळख प्रत्येकाने जपायलाच हवी.

ओळख म्हणजे नेमके काय? तर आपण आपल्यासाठी निर्माण केलेली वाट. या वाटेवरून चालताना आपण एकटे असतो पण मग हळूहळू
समविचारी माणसे भेटतात आणि आपला प्रवास सुखकर होतो.
हाती घेतलेले प्रत्येक कार्य श्रद्धा, निष्ठा आणि आवडीने केले तर या संपूर्ण जगाला आपली ओळख पटेल आणि मग वेगळे काही करावे लागणार नाही. आपली ओळख कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे निसर्ग. निसर्ग कुठल्याही गोष्टीसाठी दिखाऊपणा करत नाही. आपले अस्तित्त्व अबाधित ठेऊन आपले कार्य करित राहतो. तो कधीही भेदभाव करत नाही.
अशीच आपलीही स्वतंत्र ओळख असावी, कसलाही बाऊ न करता इतरांना प्रेरणा देणारी आणि आपल्याला नवा अनुभव देत समृद्ध करणारी…

छान, खूप सुंदर विचार मांडलायस.
ReplyDeleteअर्थात आपली स्वतःची वेगळी ओळख आव्हान देणा-या या जगात टिकवायला हवी. जगण्यासाठी धडपडताना आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहताना आपली ओळख प्रत्येकाने जपायलाच हवी.
खुप छान विचार आहेत. पण माणसाला स्वत:च अस्तित्व निर्माण करायला प्रयत्नांसोबत आत्मविश्वास देखील खंबीर असायला हवा ना! पण मला १ समजत नाही जर आत्मविश्वासच कमी पडत असेल तर त्या व्यक्तिने काय केले पाहिजे
ReplyDelete