(कृपया आधी या लेखाचा भाग 1 वाचावा.)
काही लक्षवेधी चेहरे
"बुनियाद', "वागले की दुनिया', "ये जो है जिंदगी', "श्रीमान श्रीमती', "खिचडी', "हम पॉंच', "साराभाई व्हर्सेस साराभाई', "तू तू मैं मैं', "हम सब बाराती' अशा लोकप्रिय विनोदी मालिकांतून अनेक चेहऱ्यांनी घराघराला हसवून सोडलं आणि आपल्या अभिनय करिअरचा समतोलही साधला. सतीश शहा, स्वरूप संपत, शफी इनामदार, अंजन श्रीवास्तव, राकेश बेदी असे कलाकार... आणि आलोकनाथ... संस्कारी बाबूजी म्हणून त्यांना सगळेच ओळखतात. त्यांनी "बुनियाद'पासून ते आता सुरू असलेल्या "ये रिश्ता क्या कहलाता है'मधील दादाजीच्या भूमिकेपर्यंत आपली अभिनेता म्हणून असलेली कारकीर्द नीट जोपासली. हिंदी सिनेमांमध्येही त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या. अभिनेते अशोक सराफ यांनीही हिंदी-मराठी सिनेमातील करिअर आणि मालिकांमधील करिअर लीलया सांभाळलं. हा त्यांनी घालून दिलेला आदर्श आहे. जो आजच्या अभिनेत्यांनीही शिकायला हवा. सुमित राघवनसुद्धा हिंदी-मराठी सिनेमा आणि हिंदी-मराठी मालिकांमधील आपलं अस्तित्व छान जपतोय. फास्टर फेणेपासून सुरू झालेला त्याचा प्रवास लक्षवेधी आहे. साराभाईमधील त्याची भूमिका कोणीच विसरू शकत नाही.
बालाजी प्रॉडक्शन हाऊसने अनेक कलाकार घडवले आणि अनेकांची कारकीर्द भरभराटीला आली. "क्योंकी सांस भी कभी बहू थी', "कहानी घर घर की', "कही तो होता' अशा "क'वाल्या मालिकांनी इतिहास घडवला आणि कलाकारांची मोठीच्या मोठी फौज नावारूपास आली. "क्यों की'मध्ये तुलसी बनून स्मृती इराणीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पण त्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना इतर कुठल्याही भूमिकांमध्ये तेवढं स्वीकारलं नाही. त्यानंतर त्यांचं राजकीय करिअर सुरू झालं. राजकारणातही अधून मधून त्यांच्या विधानांमुळे चर्चेत त्या असतातच.
"क्यों की'मधून मिहिर विराणीची भूमिका करणारा अमर उपाध्याय नंतर काही मालिकांमध्ये काम करत होता. पण तेवढा लक्षात राहिला नाही. आता तो पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. राम कपूरने "घर एक मंदिर' मालिकेपासून जी लोकप्रियता मिळवली, ती आजतागायत टिकून आहे. त्याने हिंदी मालिका, बॉलीवूड आणि वेबसीरिजमध्येही तितकीच लोकप्रियता मिळवली. त्याला यातील योग्य समतोल साधता आला. रत्ना पाठक शहा यांनी "मंडी' सिनेमापासून सुरुवात केली. हिंदी सिनेमात आईच्या भूमिका साकारल्या. नाटकात काम केलं. "साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेतील माया साराभाईची भूमिका कोणीच विसरणार नाही. तसंच याच मालिकेत इंद्रवदन साराभाईची भूमिका करणारे सतीश शहा यांनी अनेक गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी करिअरचा समतोल नीट साधला.
सुमित व्यास हा कलाकार सध्याचा स्टार आहे. सध्या तो एका सिनेमात करिना कपूरसोबत काम करतोय. पण हाच सुमित जेव्हा छोट्या पडद्यावर मालिका करत होता, तेव्हा एका मालिकेच्या सेटवरून त्याला "तुला अभिनय नीट जमत नाही आणि जमणारही नाही' असं म्हणून अक्षरशः हाकलून दिलं होतं. पण हा कलावंत "परमनंट रूममेट' या वेबसीरिजमध्ये झळकला आणि स्टार झाला. त्यानंतर हिंदी सिनेमात गेला. मग प्रेक्षक त्याचा शोध घेऊ लागले, की हा आतापर्यंत होता कुठे? तेव्हा कळलं त्याने छोट्या पडद्यावर काही मालिका केल्यात. तो यशस्वी लेखकही आहे. त्याने आपल्या करिअरला डुबता डुबता वाचवलं.
मराठी कलाकारांचा समतोल
दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी सुरू झाली आणि मराठी कलाकारांना नाटकासोबत अजून एक सक्षम दालन कला सादरीकरणासाठी उपलब्ध झालं. मग काय विचारता थाट गाण्याच्या मैफिली येथे झडू लागल्या. गप्पांचे फड रंगू लागले. महाराष्ट्राची लोककला कलात्मकतेने इथे सादर होऊ लागली. चिमणराव, गुंड्या भाऊ, फास्टर फेणे, रणजित देसाईंची स्वामी अशा पुस्तकांवर आधारित मालिका सादर होऊ लागल्या. त्यात मराठीतील लोकप्रिया कलाकार काम करू लागले. दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी, रविंद्र मंकणी, दामिनी या महामालिकेतून पत्रकाराची लेखणी तलवारीसारखी घेऊन लढलेली रणरागिणी प्रतीक्षा लोणकर आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आता प्रतिक्षा झी मराठीच्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत जिजाऊंची भूमका करतेय. सिनेमा आणि मालिका ही दोन्ही माध्यमं तिनं समर्थपणे हाताळली. मृणाल कुलकर्णीनेही स्वामी, अवंतिका यासारख्या मराठी सिनेमा हिंदीत सोनपरीसारख्या मालिकेत काम करून आपला वेगळा ठसा उमटवला.
दामिनी, अवंतिका, घरकुल, आभाळमाया, चार दिवस सासूचे या मालिकांमध्ये, तर मराठी कलाकारांची फौज होती. प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची जोडी नाटकात आणि टीव्हीवर बघताना धमालच यायची. त्यांचा विनोदी अंदाज हास्यचकीत करायचा. हिंदितल्या कृष्णा मालिकेत छोट्या कृष्णाच्या भूमिकेतला लोकप्रिय चेहरा स्वप्नील जोशीनंतर झी मराठीच्या अधुरी एक कहाणी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांमध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत गाजला. त्याने साकारलेला घना विसरण्याजोगा अजिबात नाही. मराठी सिनेमातही त्याने यशस्वी घोडदौड केली आणि करतोय. मराठीतलं अजून एक उल्लेखनीय नाव म्हणजे श्रेयस तळपदे. त्यानेही मराठी मालिका, हिंदी, मराठी सिनेमात धमाल केली. बेधुंद मनाच्या लहरी, एक होता राज्या, मग रियालिटा शोचं सूत्रसंचालन असं सगळं करत निर्माताही बनला.
महाराष्ट्राची लाडकी सून अलका कुबल यांनी ओटी खणा-नारळाची, माहेरची साडीसारख्या सिनेमांतून घराघरात पोहोचल्या. नंतर मराठी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. अगदी आतापर्यंत कलर्स मराठीच्या धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या कार्यक्रमाचं त्या सूत्रसंचालक आहेत. सुप्रिया पिळगावकर यांनी मराठी सिनेमा आणि मालिका या दोन्हीही बाजू नीट सांभाळल्या. सध्या त्या "कुछ रंग प्यार के ऐसेही' मालिकेत आईच्या भूमिकेत आहेत.
मराठीत सिनेमात काम करणाऱ्या जवळ जवळ सर्वच कलाकारांनी मालिका गाजवल्या. मराठी कलाकारांच्या अभिनयकलेचा पाया नाटकात काम केल्यामुळे भक्कम असतो म्हणून हिंदी सिनेमात त्यांना आता ताकदीचे रोल मिळताय. एकीकडे विजया मेहतांचं सत्यजित रे च्या स्कूलमधून बाहेर पडलेले मालिकांमध्ये बायका छान छान कपडे, लिपस्टिक लावून दागिने घालून घरात वावरतात. तशाच झोपतात अशी टिका करणाऱ्या विजयाबाईचं ऐकतातही. पण मालिकेतही समर्थपणे कामही करतात. अशीही एक कलाकार पिढी आहे. विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, विनय आपटे, रिमा लागू, निर्मिती सावंत, भरत जाधव, प्रसाद ओक, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांनी टीव्ही हे माध्यम आपल्या अभिनयाने समृद्ध जेवढं की त्यांनी सिनेमा आणि नाटकासाठी केलं.
म्हणून मराठी कलाकारांना दाद द्यावीशी वाटते की त्यांनी टीव्ही, सिनेमा, नाटक आणि हिंदीतही अधूनमधून का होईना आपल्या या अभिनयाने ते लक्षवेधी ठरले. फारसे विस्मृतीत गेले नाहीत. त्यांचाच वारसा आजही तरुण कलाकारांची पिढी जपतेय.
अमेय वाघ, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, देवदत्त नागे, वैभव तत्त्ववादी, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, प्रिया बापट, उमेश कदम, शशांक केतकर, तेजश्री प्रधान, सुरूची आजरकर, अनिता दातेही काही मोजकी नावं पण यांच्याबरोबर असे अनेक गोड चेहरे आपली ओळख निर्माण करतायत.
मराठीत सध्या तीन प्रमुख वाहिन्या आहेत. यातील सध्या सुरू असलेल्या मालिकांतील मुख्य भूमिकेत अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. ज्यांनी मराठी सिनेमात आणि नाटकात लोकप्रियता मिळवली तितकीच लोकप्रियता इथेही मिळवली.
किशोरी शहाणे, निर्मिती सावंत, श्रुती मराठे, अभिजित खांडकेकर, प्राजक्ता माळी, सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, उपेंद्र लिमये, अमोल कोल्हे, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, स्वप्नील जोशी, वैभव तत्त्ववादी अशी किती तरी नावं घेता येतील. ज्यांनी मराठी सिनेमा, कधी हिंदी सिनेमा किंवा मालिकेत काम तर कधी मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत समतोल साधला आणि प्रेक्षकांच्याही ते लक्षात राहिले.
बॉलीवूड लाखो-करोडोंची उड्डाणं करत असताना आता छोटा पडदाही मागे नाही. मालिका आणि रिऍलिटी शोचं बजेट आता सिनेमांएवढंच असतं. त्यात बॉलीवूडच्या सुपरस्टारना आणण्याच्या प्रयत्नात वाहिन्या असतात. कधी कधी ही गणितं जुळतात. काही फिस्कटतात. "सत्यमेव जयते' शो मधून आमीर खान छोट्या पडद्यावर आला. तेव्हा पहिल्या एपिसोडला सर्व रस्ते सामसूम होते आणि सारे प्रेक्षक टीव्हीसमोर होते. मग हळूहळू या शोची लोकप्रियता कमी होत गेली. दुसरं पर्व फारसं हीट झालं नाही. मग या शोची "पाणी फाऊंडेशन'च्या रूपात लोकचळवळ बनली तीही पुन्हा शोच्या रूपात प्रेक्षकांनी पाहिली.
रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून बॉलीवूड कलाकार येतात किंवा सूत्रसंचालक म्हणून. असं आतापर्यंत अमिताभपासून, मिथुन चक्रवर्ती, सुनील शेट्टी ते शबाना आझमी ते अगदी शिल्पा शेट्टीपर्यंत दिसतं. तिन्ही लोकप्रिय खान आता छोट्या पडद्याला सरावले आहेत. सध्या अक्षयकुमार, सलमान खान, अमिताभ बच्चन हे छोट्या पडद्यावर धमाल उडवत आहेत आणि शाहरूख खानही छोट्या पडद्यावर वाहिनीवर येण्यासाठी पुन्हा सिद्ध झाला आहे.
"स्टार', "सोनी', "झी', "कलर्स' अशा लोकप्रिय वाहिन्यांची सिनेमा क्षेत्रातल्या मंडळींना छोट्या पडद्यावर आणण्याची स्पर्धा सुरू असते. तसे या याच वाहिन्यांवर मुख्य भूमिकेत काम करणारे चेहरे बॉलीवूडची स्वप्नं पाहत असतात.
प्रेक्षकांनाही वाटत असतं, यांनी बॉलीवूडमध्येही गेलं पाहिजे यार.
एकूणच छोट्या पडद्याला मोठ्या पडद्याची भुरळ पडते आणि मोठ्या पडद्याला छोट्या पडद्याची. आणि हे चालायचंच. कारण मुळात आता भूमिका महत्त्वाची ठरतेय. कॉन्टेट इज किंग नाऊ... सिनेमा, मालिका, वेबसीरिज सारं आपलंच आहे.
2017 सकाळ मुंबई दिवाळी अंक #स्वप्नांचीफॅक्टरी साठी लिहिलेला लेख.

No comments:
Post a Comment