स्वाभिमानी,
खराखुरा प्रत्येक कलावंत आपल्या कलेतून बंड करत असतो. मग तो
लेखक असो, चित्रकार असो किंवा आणखीन कोणी. हे
बंड कधी स्वतःशी असतं… तर कधी
प्रस्थापित व्यवस्थेशी असतं. यात त्याला आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण
करायचे नसते, कारण तो आपल्या
निर्मितीशीलतेशी प्रामाणिक असतो. परंतु दुर्दैव असे की त्याचे
हे बंड… कोणाला कळते… कोणाला
कळत नाही…त्याचबरोबर कळले तरी न कळण्याचे
सोंग घेतलेला एक गटही त्यात असतो.
कलेसाठी
कला आणि जीवनासाठी कला हे
दोन प्रवाह आपल्याला साहित्याच्या, कलेच्या आणि
कलावंताच्या बाबतीत दिसतात. हे
दोन चिरंतन मतप्रवाह आहेत. कलेसाठी
कला या विचारासाठी कमालीचे समर्पण लागते. म्हणजेच कलेसाठी स्वतःला झोकून देणे. त्यासाठी
कलावंताने पैसै, प्रसिद्धीची हाव न धरता
आपला आत्माविष्कार करत राहणे, हे अपेक्षित असते. पण अशाने नंतर निराशा पदरी येण्याचा संभव असतो.
जीवनासाठी
कला या विचारात लेखकाची, कलावंताची स्वतःची अशी ठाम भूमिका असावी लागते. आपली
भारतीय संस्कृती या विचाराची समर्थक आहे. या विचारात
कलवंताला मान, सन्मान, पैसा, प्रसिद्धी सारं काही मिळेल. येथे कलावंताची सामाजिक बांधिलकी हा मुद्दा
येतो. आपण समाजाचेच एक भाग आहोत. या भावनेने
त्याचे सृजन फुलू लागते.
त्यामुळे
कलावाद की जीवनवादॽ कलावंत की समाजॽ या प्रश्नातील समतोल साधणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विवेकाची आवश्यकता आहे.
दोन्ही बाजू घेऊन वाद घातल्याने किंवा दोन्हीपैकी एक अशी टोकाची भूमिका घेऊन चर्चा करत राहिल्यास त्यातून काहीही साध्य होणार नाही. मात्र यामुळे आपण उच्च कोटीच्या साहित्याला, कलेला
पारखे होऊ हे नक्की. म्हणूनच आपल्या भारतीय समाजाला आतापर्यंत न साधता
आलेला समतोल साधण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
त्यासाठी
सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. तेव्हाच आपल्या समाजातील अनेक तळागाळातील कलावंतांना त्यांच्या योग्यतेचे स्थान मिळू शकेल. त्यांच्या
कलेला सर्वांसमोर येण्यासाठी वाव मिळेल. समाजातील बदल जसा सर्वसामान्य माणसाला जाणवतो, तसाच
तो सर्जनशील कलावंतास
जाणवतो. तरीही सर्वसामान्य माणसाचे व्यक्त होणे वेगळे असते आणि कलावंताचे व्यक्त होणे
वेगळे असते. असे असले तरी दोघांनीही हे लक्षात
ठेवले पाहिजे की एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांचा आदर करत समर्थ आणि सक्षम समाज घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे…
शेवटी कलावंत आणि सर्वसामान्य माणसाला हेच वाटत असते की जगणे सहज, सुंदर सोपे व्हावे.
मग त्यासाठी एकमेकांची मुस्कटदाबी कशासाठीॽ दोघेही समाजाचा अविभाज्य
घटक आहात…परस्परांनी तडजोडीचे किंवा तंटे-बखेड्याचे धोरण अवलंबले तर नुकसान पुन्हा
समाजाचेच आहे. त्यापेक्षा दोघांनीही सामंज्यस्याची, एकमेकांना समजून घेण्याची भूमिका
पार पाडली, तरच आपली सांस्कृतिक पडझड थांबेल. यासाठी निसर्गाकडे असलेला ‘समतोल’ हा गुणधर्म अंगीकारण्याची
आज नितांत आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment