'पुरुषानेही स्त्रीवर अव्यभिचारी, अचल प्रेम करायला हवे. स्त्रीनिष्ठा
अपेक्षिणाऱ्या पुरुषांच्या दुटप्पी आणि दांभिकतेचा निषेध करावा तितका
थोडाच. प्रेमाच्या साम्राज्यात स्त्री-पुरुष समान हवेत...' अशा वेळोवेळी
धाडसी विचार मांडणाऱ्या हिराबाई पेडणेकर. त्यांचं आद्य महिला नाटककार
म्हणून कार्य तसं दुलर्क्षित राहिलं असतं. पण लेखिका शिल्पा सुर्वे यांनी
मात्र या गुणी, कलावंत ह्रदयाच्या आणि धाडसी लेखिकेचं चरीत्र शब्दबद्ध केलं
आणि आजच्या पिढीला त्यांची ओळख करून
दिली. अलिकडे काहीही माहिती हवी झाल्यास आपण विकीपीडीवर जातो. गुगल करतो.
तिथे जेवढं काही वाचायला मिळेल, सापडेल तेवढंच आपल्याला वाटतं की एवढीच
माहिती आहे. यापुढे फार काही कुणाचं कार्य नसेलच. अशा व्यक्तिमत्त्वांविषयी
वाचायला क्वचित हल्ली पुस्तकांचा आधार घेतो. पण काही निखळ, निरलस सुंदर
वाचायचं असेल तर आजही पुस्तकांशिवाय पर्याय नाही.
कारण मराठीतही काही वेगळ्या वाटेवरची, एखाद्या विस्मृत गेलेल्या व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य उलगडणारी पुस्तकं तितक्याच तरलतेने लिहिली जातायत. याचं अलिकडंचं ताजं उदाहरण म्हणजे शिल्पा सुर्वे
यांनी लिहिलेलं हिराबाई पेडणेकरांचं चरीत्रात्मक पुस्तक.
पत्रकारितेचा 13 वर्षाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या लेखिका शिल्पा सुर्वे यांना पत्रकाराच्या शोधक नजरेने त्यांना हिराबाईपर्यंत पोहोचवलं आहे. कारण अतिशय मनापासून घडवलेली ही कलाकृती आहे, हे पुस्तक वाचताना जाणवतंय. ज्या काळात स्त्रिया रंगभूमीवर काम करत नव्हत्या. नाटकातंही स्त्रीपात्र पुरुषच करत अशा काळात हिराबाईंचं संगीत दामिनी रंगभूमीवर झळकलं. हिराबाईंचा संगीतमय असला तरी हा काळजाला भिडणारा प्रवास लेखिकेने ओघवत्या शैलीत रेखाटलाय. हिराबाईंची संगीत साधना, कलेच्या क्षेत्रात वेगळं काही करण्याची धडपड, प्रस्थापितांच्या साम्राज्याला त्यांनी धडका देणं, एक माणूस म्हणून प्रत्येक पावलांवर त्यांना करावा लागलेला संघर्ष हे वाचताना सुन्न व्हायला होतं. पालशेतला निघण्याआधी हिराच्या मैत्रिणी सुधा आणि अंजनी भेटायला येतात तो प्रसंग अधिक तरल हळवा झालाय. हिरा सगळ्यापासून दूर पालशेतला जाऊन राहणार याचं मैत्रिणींना दुखही झालं होतं आणि अखेर तिच्या जिवाभावाचा माणूस भेटला म्हणून समाधानही झालं होतं. पुस्तकातील असे कित्येक छोटे छोटे प्रसंग छान रंगले आहेत. गिरगावातील कांदेवाडीचा परीसर कधी मधी दिसतो. पण आता तो परीसर पाहताना एक वेगळी दृष्टी मिळेल. या परीसराने एका महत्त्वाकांक्षी कलावंत गायिकेची धडपड पाहिली, तिचा संघर्ष पाहिला. तिची कला पाहिली. पण त्यातून इतर वलयांकित नाट्यमंडळींसारखा आपल्याला मान मिळावा या स्वप्नाला मात्र या जागेने अपुरं राहताना पाहिलं. हे सारं आठवेल. अशा त्या काळातील कित्येक कलावंतांची धडपड मुंबईने खास करून दक्षिण मुंबईने पाहिली असेल. त्यातल्या हिराचा परीचय आपल्याला शिल्पा सुर्वे या लेखिकेमुळे झाला. हे वाचक म्हणून प्रत्येकाला समाधान देणारं आहे. पण हिराची शोकांतिका चटका लावून जाते.
पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती

No comments:
Post a Comment