ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एका फिचरसाठी लिहिलेलं...उशीर झाला पोस्ट करायला...पण वाचा आणि प्रतिक्रिया कळवा...
काय झालं?
- 24 तास मनोरंजनाच्या हेतूने सुरू झालेल्या वाहिन्या आणि न्यूज वाहिन्या असे दोन भाग झाले. मनोरंजन वाहिन्यांना जनरल एंटरटेनमेंट चॅनल असं संबोधलं जातं. 24 तास कार्यक्रम प्रसारित करण्याऐवजी एक "प्राईम टाईम' निश्चित करून त्यावेळेत नवे कार्यक्रम आणि इतर वेळेत त्यांचे रिपिट टेलिकास्ट दाखवण्याचे ठरले. पण त्यातही आता प्राईम टाईम संध्याकाळी 5 वाजताचा झाला आहे. पहिला तो 8 किंवा 7 मानला जाई.
- वाहिन्यांनी आपले कार्यक्रमाचे एपिसोड यूट्यूबचा आधार घेत संपूर्ण एपिसोड यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्यांना टीव्हीवरच्या मालिकांच्या वेळात त्या पहाणं शक्य नव्हतं त्यांना याचा फायदा झाला.
- आपल्या मालिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन मालिकांनी युट्यूबर पूर्ण एपिसोड अपलोड करणे बंद केले. आता वाहिन्या टीझर, प्रोमो, बेस्ट सीन किंवा एपिसोडचा दोन ते 7 मिनिटांचा भाग अपलोड करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात.
- वेबसिरिजचं नवं माध्यम खुलं झालं. फक्त महोत्सवात पहायला मिळणाऱ्या शॉर्ट फिल्मस यूट्यूबर अपलोड होऊ लागल्या.
- वाहिन्यांनी सोशल मीडियावरून खास करून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्ट्विटरचा वापर करून जोरदार मार्केटिंग करण्यास सुरुवात केली.
- स्टार, सोनी, झी आणि कलर्स वाहिन्यांच्या समूहाने आपापली अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर आणली. त्याला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून ऑन एअर एपिसोडच्या वेळीच तो एपिसोड बघायचा झाल्यास अॅप्स पाहणाऱ्या ऑनलाईन प्रेक्षकांकडून ठरावीक मूल्य आकारायला सुरुवात केली. नेटफ्लीक्सने भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केले.
- सोशल मीडिया वाहिन्यांशी स्पर्धा करू लागला. आणि वेबसिरिजचं नवं आव्हान मालिकांसमोर उभं राहिलं.
- सिनेमासुद्धा अॅमेझॉनने घरबसल्या प्रेक्षकांना उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर चॅनलच्या अॅपवरही सिनेमे पाहता येणे शक्य झाले. मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध नाव एकता कपूरने स्वतःचं अल्ट बालाजी हे अॅप सुरू केलं.

- बार्कने फक्त हिंदी मालिकांसाठी रिजनल आणि अर्बन असे दोन विभागात टीआरपी मेजर्स द्यायला सुरुवात केली. आणि स्टार प्लस आणि झी मराठीने दुपारचा प्राईम टाईम बॅन्ड सुरू केलाय.
- लाईफ ओके या स्टार समुहाच्या वाहिनीचं रिब्रॅंडींग होऊन स्टार भारत नावाची वाहिनी सुरू झाली.
- इश्कबाज या मालिकेने तीन भावांची गोष्ट सांगून पहिल्यांदा पुरुष पात्रांभोवती फिरणारी मालिका म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. आणि मालिका सुरू झाल्यापासून कायम चर्चेत राहिली. ऑनलाईन प्रेक्षकांनी त्यांना हवी तशी घडवलेली ही पहिलीच मालिका.
काय होईल?
- प्राईम टाईमचं युद्ध आता हातातल्या मोबाईलवर सुरू होईल.
- ऑनलाईन प्रेक्षकांचा दबावगट मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसेल. कारण अॅप्सवर मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. एकही मालिका किंवा तिचा एपिसोड फ्री पाहता येणार नाही.
- यूट्यूबही चॅनल्सना लाईव्ह स्ट्रीमिंग साठी एक वेगळा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
- सध्या सेन्सॉर बॉर्ड सिनेमांवर "बाळबोध' नियम लावून काटछाटीचा पर्याय सुचवतं. याला येत्या काळात आव्हान म्हणून सिनेमे थेट यूट्यूबवर किंवा ऑनआईन रिलिज केले जातील.
- येत्या काळात प्रादेशिक भाषांमधील "कॉन्टेट'ला (कार्यक्रमांना) जास्त मागणी असेल आणि असेच कार्यक्रम जास्त पाहिले जातील.
- अलिकडच्या 2-3 वर्षात फूड आणि संगीत याविषयांवर जास्त प्रमाणात कॉन्टेट निर्माण झाला. यात यापुढे वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment