मला भावलेल्या बॉलीवूडच्या सप्तनायिकांविषयी हे थोडसं आणि थोडक्यात...
प्रभावी रम्या
बाहुबली सीरिजमधील शिवगामी देवीच्या व्यक्तिरेखेमुळे ओळखली जाणारी पसुपुलेती रम्या म्हणजेच रम्या क्रिष्णन. आतापर्यंत तिने 200 सिनेमांमध्ये काम केलंय. त्यात हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या भाषांचा समावेश आहे. तिला तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत आणि इतर दक्षिणेकडील सिनेक्षेत्रातही पुरस्कार मिळवले आहेत. तिने अभिनयाची सुरुवात केली फक्त 13 वर्षांची असल्यापासून. "सूत्रधारुलु' या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. तमीळ कुटुंबात जन्मलेल्या रम्याला तिचे काका म्हणजेच प्रसिद्ध विनोदी अभिनेते चो रामास्वामी यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं. रम्या क्रिष्णनने विविध नृत्य प्रकार अथक साधनेने आत्मसात केले आहेत. कुचीपुडी, भरतनाट्यमसोबत पाश्चात्य नृत्य प्रकारांचीही तिला चांगली जाण आहे. नेरम पलारुमबोल हा तिचा पहिला सिनेमा मल्याळम भाषेत होता. हिंदीमध्ये बडे मिया छोटे मिया, शपथ, बनारसी बाबू, दयावान, चाहत, परंपरा या सिनेमांमधील काम विशेष लक्षात राहिलं; पण तिची शिवगामीची भूमिका स्त्री शक्तीची वेगळी ओळख करून देणारी ठरली.
मेहनती भूमी
यशराज फिल्म प्रॉडक्शनसाठी सहायक कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करणारी भूमी पेडणेकर. "दम लागे हईशा' या सिनेमासाठीही ती नेहमीप्रमाणेच बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच कास्टिंग करत होती. त्यांना ती भूमिका समजावून सांगत होती. एकेदिवशी लेखक, दिग्दर्शक शरत कटारिया तिला म्हणाला, "तू ही भूमिका खूप छान समजावून सांगतेस, तूही ऑडिशन दे.' आणि काय आश्चर्य तिची निवड झाली. त्यानंतर भूमीच्या रूपातील अभिनेत्रीने प्रेक्षकांची वाहवाच मिळवली आहे. तिने यशराज फिल्म प्रॉडक्शन सोबत आणखी तीन सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. या 27 वर्षीय अभिनेत्रीचा सोशल मीडियावर जास्त वावर नसतो; पण तिच्या ट्विटर हॅंडल आणि इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर तिच्याविषयी तिने लिहिलंय की ऍक्टर ड्रीमर, फ्युचर लीडर... हे वाचून ती पुढे राजकारणात जाणार आहे की काय असंही बोललं जातंय. भूमी लहानपणापसूनच एक फिल्मी गर्ल आहे. तिला सिनेमाविषयी खूप जिव्हाळा आहे. तिच्या पहिल्याच सिनेमासाठी तिला पदापर्णाचा पुरस्कार मिळाला. एकूणच दम लगा के हईशासाठी तिला एकूण सहा पुरस्कार मिळाले आहेत. तिने आतापर्यंत काम केलेल्या दम लगा के हईशा, टॉयलेट एक प्रेमकथा, शुभमंगल सावधान हे तिन्ही सिनेमे व्यावसायिकदृष्ट्या हिट आहेत. त्यातील तिच्या भूमिकाही प्रेक्षक पसंतीस उतरल्यात. महत्त्वाचे म्हणजे तिच्या या तिन्ही भूमिका स्त्रीमधला ठामपणा मांडणाऱ्या
होत्या.
चुलबुली आलिया
संघर्ष या सिनेमात प्रीती झिंटाने साकारलेली रित ओबेरॉयच्या भूमिकेत लहानपणीची रित आलियाने साकारली होती. तेव्हापासून खरंतर आलियाचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला होता. चार वर्षांची असतानाच आपण छोट्या मोठ्या बाळबोध घोषणा करतो तसं तिने केलं होतं की मी अभिनेत्री होणार... आणि खरंच एकूण नऊ सिनेमांमध्ये काम करून आलिया बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झालीय. स्टुडंट ऑफ द इयरमध्ये तिने कथेप्रमाणे छानच अभिनय केला होता; पण हायवे सिनेमातील भूमिकेत तिने खरंच मेहनत केलेली दिसली. मग तिला कोणीच रोखू शकलं नाही. 2 स्टेस्टस्, हम्टी शर्मा की दुल्हनिया, कपूर अँड सन्स, उडता पंजाब, बद्रीनाथ की दुल्हनिया यातल्या तिच्या भूमिका उत्तम होत्याच; पण डिअर जिंदगी सिनेमातील तिने साकारलेल्या कायराला तर कोणीच विसरू शकत नाही. तिला सेल्फी काढायला खूप आवडतं. 4 वर्षांची असल्यापासून तीने शामक दावर अकादमीमध्ये डान्स शिकायला सुरुवात केली. हायवेमधील सुहा साहा या गाण्यात तिची गाण्याची झलक दिसली. ती फिटनेस फ्रिक आहे. चुलबुली आलिया भूमिका निवडण्याबाबत चोखंदळ राहिली तर खास तिच्यासाठी भूमिका लिहिल्या जातील.
स्ट्रॉंग तापसी
तेलुगू, तमीळ, मल्याळम आणि हिंदी अशा चार भाषेत अभिनय करणारी तापसी एक दिल्लीवाली गर्ल आहे. एका वाहिनीच्या शोसाठी मॉडेल बनली. त्यानंतर अभिनय क्षेत्रात आली. मॉडेलिंग करताना प्रसिद्ध ब्रॅंडसाठी काम केलंय. डेविड धवन यांच्या चश्मेबद्दूर सिनेमातून तिने हिंदीत प्रवेश केला. आतापर्यंत तिने बेबी, पिंक, नाम शबाना, रनिंग शादी, गाझी अटॅक, जुडवा 2 या सिनेमांमध्ये लक्ष्यवेधी भूमिका साकार केल्यात. खास करून पिंक आणि नाम शबाना हे तिच्यासाठीच बनलेले सिनेमा वाटावेत इतका अप्रतिम अभिनय तिने केला. लहानपणी ती कसलीच काळजी नसलेली एक मुक्त मुलगी होती. मॅगी हे तिचं निक नेम. ती ब्युटी विथ ब्रेन आहे...कारण ती अभ्यासात अतिशय हुशार होती. अजूनही ती तिच्या दिल्लीतल्या शाळेला भेट देते आणि शाळेसाठी काहीना काही करत असते. तिला इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही रस आहे. तिची वेडिंग प्लॅनिंग करणारी द वेडिंग फॅक्टरी नावाची कंपनी आहे. तिच्यासोबत या कंपनीत दोन पार्टनर आहेत. ते काम बघतात. सामाजिक कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांच्या जीवनावर सिनेमा बनतोय आणि यात तापसी काम करतेय, अशी चर्चा आहे. तिला स्क्वॅश हा खेळ खेळायला आवडतं. सिनेमातले सगळे स्टंट ती स्वतः करते. 2011 मध्ये या एका वर्षात तिचे 7 सिनेमे प्रदर्शित झाले. अशी ती एकमेव अभिनेत्री असावी. तिच्या भूमिका तिच्यासारख्याच स्ट्रॉंग होत्या.
शिस्तप्रिय अनुष्का
सध्या विराट कोहलीसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत असली तरी अनुष्का शर्मा अभिनेत्री, मॉडेल आणि यशस्वी निर्माती आहे, हे विसरून कसं चालेल? रब ने बना दी जोडीमधील अनुष्का ते जब हॅरी मेट सेजलमधील अनुष्का...तिने आपलं वेगळेपण प्रत्येक वेळी दाखवून दिलंय. तिच्यावर लहानपणासून आर्मीचे संस्कार झालेत आणि शिस्तही. तिचे वडील आर्मी ऑफिसर आणि तिचा भाई मर्चंट नेव्हीमध्ये. तिने लहानपणापासून मॉडेल व्हायचं स्वप्नं पाहिलं होतं. त्यासाठी ती बंगलोरहून मुंबईला आली. तिने जर्नालिझमचं शिक्षण घेतलं. कारण तिने मॉडेलिंग आणि जर्नालिझम असे दोन पर्याय समोर ठेवले होते. रणबीर कपूरने एकदा बॉम्बे वेल्वेट सिनेमाच्या सेटवर तिची गंमत करावी म्हणून एक प्रॅंक केला होता; पण तिला ते कळलं नाही. तिला त्यावेळी रडू आलं. तो खूप मस्तीखोर असल्यामुळे मग तिने त्याला माफ केलं. बॅंड बाजा बारात, सुलतान, एनएच 10 आणि फिल्लौरीमधील भूमिकांसाठी तिचं कौतुक केलंच पाहिजे. हम भी कुछ कम नही हे वेळोवेळी ती दाखवून देते.
कणखर स्वरा
बॉलीवूड नायिकांच्या मुख्य प्रवाहातील यादीत स्वरा भास्कर नसली तरी तिने आपलं अभिनयातील वेगळंपण नेहमीच सिद्ध केलंय. बहीण, मैत्रीण किंवा नायिकेच्या कुणी जवळची अशा व्यक्तिरेखा साकारणारी स्वरा काही सिनेमात मुख्य भूमिकेत दिसलीय, हे विसरून चालणार नाही. संजय लीला भन्साळींच्या गुजारिशमधून हिंदी सिनेमात काम केलं तरी तनू वेड्स मनूमधील पायलच्या व्यक्तिरेखेमुळे ती लक्षात राहिली. त्यानंतर चिल्लर पार्टी, औरंगजेब, रांझणा, प्रेम रतन धन पायो या सिनेमांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या. मग नील बाटे सन्नाटा आणि अनारकली ऑफ आराह या दोन सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. ज्या की तिच्याच व्यक्तिरेखेभोवती फिरणाऱ्या होत्या.
इट्स नॉट दॅट सिंपल या मिनी वेब सीरिजमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली. टीव्हीवर काही कार्यक्रमांचं निवेदन तिने केलंय. स्वरा आपली राजकीय आणि सामाजिक मत व्यक्त करायला अजिबात घाबरत नाही. याबाबतीत तिला मानायलाच हवं, कारण तिला ट्रोल करणाऱ्यांना ती पुरून उरलीय.
स्पष्टवक्ती कंगना
सध्या बॉलीवूडमधली फटकळ अभिनेत्री म्हणून चर्चेत असणारी कंगना अभिनयातही तितकीच ग्रेट आहे. एक विलक्षण तेज आहे तिच्यात असं नेहमी वाटतं. तिचे सिनेमे पाहताना. क्वीन सिनेमात काम केलं म्हणून नाही, तर ती आहेच बॉलीवूडची राणी. 2006 मध्ये गॅंगस्टर सिनेमापासून ते सिमरनपर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. 2011 मध्ये तनू वेड्स मनूमध्ये मुख्य भूमिका साकारली आणि अभिनयाचं शिखर गाठलं. उंचपुरी, कुरळे केस, बोलके डोळे, उत्तम बोली यामुळे ती उठून दिसते. तनूची व्यक्तिरेखा दोन्ही वेळेस ती अक्षरशः जगली. क्वीनमधला तिचा प्रत्येक संवाद सिनेमागृहात टाळ्या वाजवायला लावणारा होता. तमीळ आणि तेलुगू सिनेमातही तिने काम केलंय. तिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार तीन वेळा मिळालाय आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळालेत. ती स्पष्टवक्तेपण अनेकदा फटकळपणाकडे झुकतं. तिने सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीत काम करायला सुरुवातीपासूनच नकार दिलाय. एका मध्यमवर्गीय घरातील मुलीने स्वप्न पाहिलं तर किती मोठं यश मिळवू शकते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कंगना. तिने मुंबईत आल्यावर मॉडेलिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कथ्थक शिकली. आता ती गाणंही शिकतेय. माझे सत्याचे प्रयोग हे तिचं आवडतं पुस्तक आहे. विश्वास नाही बसत पण आहे. लेखन करणं, स्वयंपाक करणं, वाचणं आणि बास्केटबॉल खेळणं तिला खूप आवडतं. महिला सक्षमीकरण हा तिचा अभ्यासाचा विषय आहे. तेच ती मणकर्णिका सिनेमातूनही दाखवून देणार आहे.

No comments:
Post a Comment