‘स्वप्न’ हा शब्द किती मोहक आहे. सपना, ड्रीम, सपान अशा कितीतरी
गोंडस नावांनी तो उच्चारला जातो, ओळखला जातो. आपलं स्वप्न, माझं स्वप्न असं म्हणत ही स्वप्नं आपल्या
आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. स्वप्नांशिवाय आपण जगूच शकत
नाही. स्वप्न आपल्या आयुष्यात सकारात्मक आशावाद निर्माण करतात.
आपण पाहिलेली ही स्वप्न म्हणजे भविष्यकाळासाठी आपल्याला गवसलेली नवी
दिशा असते. आणि त्याच दिशेने चालत चालत गेलो की आपली स्वप्न प्रत्यक्ष
साकार झालेली आपल्याला दिसतात. तेव्हा मात्र आपल्या आनंदाला पारावार
उरत नाही.
असं म्हणतात
की, जेव्हा आपण आपलं एखादं स्वप्न सत्यात उतरवतो
तेव्हा आपण परिवर्तन घडवून आणत असतो.
कारण आला दिवस भविष्याची चिंता करण्यात घालवला तर भविष्याकाळातील उज्ज्वल यशाला आपण पारखे होऊ. मग मात्र आपल्या हाती काहीच नसेल. म्हणूनच आपली स्वप्ने मुठीत पकडून ठेवा त्यांना भरकटू देऊ नका. आपली स्वप्न आपल्याजवळ नसतील तर आपल्या असण्याला अर्थ उरत नाही.
आपलं आयुष्य आनंदाने भारून टाकणारी आपली स्वप्ने ध्येयाची जोड देऊन फुलवा आणि मग पहा तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मग ठरलं तर! आजपासून स्वप्नांच्या गावी जाऊन मनसोक्त बागडायचे, हसायचे, खेळायचे, नाचायचे…आणि त्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी मनापासून हाती घेतलेले काम करायचे. हे फार सोपं आहे…सोडून द्या राग, लोभ, चिंता…ते पहा स्वप्नांचं फुलपाखरू येतंय…
खुप छान
ReplyDeletethank u so much!
Delete