(अपूर्वा बागेत बसली आहे. तिथे विपुल येतो. तिच्या बाजूला येऊन बसतो. अपूर्वा
खूश होते. पण त्याचं हे अचानक येणं असतं. त्यामुळे अप्पूला आश्चर्य वाटतं.)
अपूर्वा – हाय विपुल.
विपुल – हाय अप्पू...तू इथे कशी काय...
अपूर्वा – मी इथे रोज येते, फेऱ्या मारायला. मला हे गार्डनही खूप आवडतं.
विपुल- ओ, फाईन...
अप्पू - पण तू इथे कसा काय...
विपुल - मी माझ्या गर्लफ्रेन्डला भेटायला आलोय. (त्याच्या हातात मोठा येलो फ्लावर्सचा
बुके असतो.)
अप्पू- (निराश होते.) ओह... (उठून जायला निघते...)
विपुल – (तिला हाताला धरून बसवतो.) पण तू बस ना...काहीच हरकत नाही. तिला राग
नाही येणार...
(ती नाईलाजाने बसते. तिच्या मनात हलचल चालू आहे. विपुल तिची फिरकी घेतोय हे
कळत नाही.)
अप्पू मला काही टिप्स दे ना...
अपूर्वा – कसल्या टिप्स...
विपुल – हेच की तिच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं...
अपूर्वा – आता ते मी कसं सांगू...तुमचं दोघांचं प्रेमाचं नातं आहे.
विपुल – पण तू दे मला टिप्स, ऐकेन मी तुझं...
अपूर्वा – नाही, नाही मला नाही देता येत कसल्या टिप्स-बिप्स... मी जाते...तु
तूझ्या गर्लफ्रेन्डला भेट, तिला बुके दे... माझी लुडबुड मध्ये कशासाठी...
विपुल – अगं ए थांब... (विपुलच्या चेहऱ्यावर खोडकर स्माईल)
अपूर्वा- नाही, मला आता आठवलं मला घरी खूप काम आहे. मी जाते..
विपुल – तू गेलीस तर माझी गर्लफ्रेंड मला कशी भेटणार... (अजूनही अप्पूला कळत
नाहीय. विपुल तिची गंमत करतोय ते)
अपूर्वा – म्हणजे... माझ्या जाण्याचं आणि तुझ्या गर्लफ्रेंडच्या येण्याचं काय
कनेक्शन...
विपुल – कनेक्शन आहे...मॅडम...(असं बोलून तो तिचा हात धरतो. आणि तिच्या हातात
तो बुके देतो.)
अपूर्वा – विपुल यू कार्टून... (आत्ता तिला कळतं, अप्पू खूश होते, आणि ती त्या
फुलांच्या बुकेनेच त्याला मारू लागते. तोही हसतो आणि तिचा मार चुकवू लागतो.)
विपुल – हूँ...हूँ..कसं फसवलं, एका क्यूट मुलीला...
अपूर्वा – (विपुलकडे पाहते, आणि लाजते. पुढे बोलते) पण अश्शी सोडणार नाही
तुला...(त्याच्या कानाला त्या बुकेतलं एक फुल लावते.) चल उठबश्या काढ, थट्टा केलीस
ना माझी...
विपुल- बरं बाबा...काढतो..(तो उठबश्या काढू लागतो. मग तिच त्याला
थांबवते)...बस पुरे आता निघूया...(विपुल तिच्या पुढे दोन हात करतो, म्हणतो उठायला
मदत कर, ती त्याला हात द्यायला जाते, तेव्हा तो तिला ओढतो. आणि दोघेही बागेतल्या
हिरवळीवर पडतात. मग बराच वेळ हिरवळीवर झोपून आकाशाकडे पाहत राहतात....
Scene Cut
No comments:
Post a Comment