(समोर सनसेट होतो आहे, मस्त माहोल आहे, विपुल आणि अपूर्वा सुर्यास्त पाहत बसले
आहेत. समोर पाहत आहेत आणि पुन्हा एकमेकांकडे पाहत आहेत, एकमेकांकडे पाहताना गढून
गेले आहेत, आसपासचा विसर पडला आहे, हळुहळु दोघांचे हातात हात गुंफले जातात, विपुल
तिचा हात आपल्या ह्रदयावर ठेवतो. तिच्या हाताला किस करतो, अपूर्वा लाजतेय... ती त्याचा हात पटकन सोडवून
घेते.)
अपूर्वा - किती मस्त वाटतंय, असं वाटतंय इथेच बसून रहावं तासनतास..
विपुल - हो का (लाडाने)
अपूर्वा - हो... मला तुला काही सांगायचंय...
विपुल – पण मला माहितेय, तुला काय सांगायचंय (तो तिच्या डोळ्यात पाहतो आणि
तिचा हात पुन्हा आपल्या हातात घेतो.)
अपूर्वा – तू माझ्या आयुष्यात आलेला पहिला आणि शेवटचा मुलगा आहेस... तुझ्याशिवाय
इतर कुणावरही मी इतकं प्रेम केलं नाही, आणि तुझ्यानंतर मी कुणावरही इतकं प्रेम करू
शकणार नाही. (तिच्या डोळ्यातून अश्रू येतात.)
विपुल - (तिच्याकडे पाहत आहे, तिचं बोलून झाल्यावर दोन सेकंद थांबून बोलतो.)
मला माहितेय. (आणि तिला प्रेमाने जवळ घेतो. ती त्याच्या छातीवर डोकं टेकते. तो
एकदा तिच्याकडे पाहत मग पुढे सुर्यास्ताकडे पाहतो. आणि पुढचं वाक्य बोलतो.)
आजपासून पुन्हा नव्याने आपलं आयुष्य सुरू करूया. इथून पुढे, आपण कधीही एकमेकांशी
भांडायचं नाही, एकमेकांवर रागवायचं नाही. जे राग, लोभ, रुसवे फुगवे असतील ते
दोघांनी मिळून सोडवायचे. आता आपल्या दोघांमध्ये कुणा तिसऱ्याला जागा नाही.
अपूर्वा – तुला माहितेय...माझी आई नेहमी म्हणायची, काळजी करू नकोस, अखेर तुझं
विपुलशीच जमणार आहे. तेव्हा मी आईला आपले भांडणाचे किस्से सांगायचे. आणि
तुझ्यावरचा राग घरातल्यांवर निघायचा. तेव्हा आई जवळ घेत म्हणायची, अप्पू तुझ्या
बोलण्यात हजारदा विपुलचं नाव येतं. आणि विपुल किती चांगला मुलगा आहे. तुम्ही
दोघांनी मिळून प्रॉब्लेम्स सोडवत का नाही. असं एकट्यानं झुरत बसण्याला काय अर्थ
आहे?
विपुल - हो, इतके दिवस तू माझ्याशी बोलली नाहीस...तर मलाही चैन पडत नव्हतं.
सारखा तुझ्या फोनची वाट पाहत होतो. वाटायचं...आत्ता तू फोन करशील आणि
विचारशील...कधी भेटतोस मला...तुझ्याशी खूप बोलायचंय...
अपूर्वा – होतं असं कधी कधी की आपण काही वेळा आपल्या खूप जवळच्या माणसाला
समजूनच घेऊ शकत नाही. तेव्हा डोक्यात राग असतो. त्यापुढे आपुलकीचे चार शब्दही खोटे
वाटू लागतात. त्यासाठी थोडा वेळ जाऊ देणं हेच चांगलं...
विपुल - त्या दिवशीचे आपण हे आपण नव्हतोच दुसरेच कुणीतरी होतो. पण मला आज
तुझ्याकडून एक वचन हवंय अप्पू, लग्नानंतर आपण एकमेकांचे बोअरींग लाईफ पार्टनर
व्हायचं नाही...आपण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स व्हायचं. आणि आयुष्यातील प्रत्येक
क्षण एन्जॉय करायचा. तू देशील मला साथ...
अपूर्वा- (मानेनेच "हो" म्हणते.)
(आता आपल्याला ते दोघे एकमेकांना
बिलगून बसलेले पाठमोरे दिसतात आणि SCENE CUT)
very nice manala kasa haluwar spars karun jato to shan....nice
ReplyDelete