काही क्षण अनमोलच असतात. ते गोड आठवणींच्या स्वरूपात कायम स्मरणात राहतात. असाच तो क्षण होता, काही खास मुलींसाठी आयोजित केलेला बाहुबली - २ हा चित्रपट पाहण्याचा. रेस्क्यू फाऊंडेशन, सकाळ माध्यम समूह आणि पनवेल ओरियन माॅलने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने पुनःप्रत्ययाचा आनंदही दिला आणि सोबत नव्या मैत्रिणींची भेट घडवली. त्या क्षणांचे साक्षीदार न होऊ शकलेल्या वाचकांसाठी ही शब्दात बांधलेली त्या क्षणांची मोतीमाळ...
वर कोऱ्या आभाळाची
भट्टी तापली तापली
खाली लेकरांची माय
वारा पदराने घाली...
कवितेतल्या ओळींनुसार कितीही ऊन, वारा-वादळ झालं तरी सावरायला आपली आई आहे. आपल्या जवळची माणसं आहेत. ती आपल्याला सावरतील आपल्या मायेचा, प्रेमाचा पदर धरतील; पण इथे आलेल्या मुली या मायेच्या पदरालाच पारख्या झालेल्या होत्या. आपुलकीच्या चार शब्दांसाठी आसुसलेल्या होत्या; तरी कुठेही लाचारी दिसत नव्हती. आपली ओळख पुसून टाकण्याची केविलवाणी धडपड नव्हती, तर त्या ओळखीचं मनावर दडपण न घेता पुन्हा नवी ओळख निर्माण करण्याचं साहस त्यांच्यात दिसत होतं. त्यांच्याशी बोलताना ते जाणवत होतं. रेस्क्यू फाऊंडेशनच्या रूपात त्या मुलींना मायेचा पदर मिळालाय. त्यामुळे त्यांच्या पंखांना बळ मिळालंय आणि त्या जोरावर त्या नवी स्वप्नं पाहण्यासाठी आणि उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

निमित्त होतं रेस्क्यु फाऊंडेशनमधील मुलींना बाहुबली सिनेमा दाखवण्याचं. चिमुकल्या पायलने आपल्या अनोख्या शब्दांत तशी गोड ताकीद दिली होती. मला बाहुबली बघायचाय. मग तिची आणि इतर मुलींची बाहुबली पाहण्याची इच्छापूर्ती करण्यासाठी रेस्क्यू फाऊंडेशन, सकाळ माध्यम समूह आणि ओरियन मॉलचे सारे सहकारी एकवटले.
बाहुबली सिनेमा तर अख्ख्या जगभर गाजतोय. सिनेमा पाहणारे त्याची तारीफ करताना थकत नाहीयेत. मग या मुलींनी तरी या आनंदापासून का वंचित रहावं, म्हणूनच हा बाहुबलीचा खास शो या खास मुलींसाठी आयोजित करण्यात आला होता. आता तुम्ही म्हणाल त्या मुली कोण आहेत? ज्यांच्यासाठी एवढं चाललंय... तर त्या खूप स्पेशल आहेत. त्यांच्या भूतकाळाने त्यांना असंख्य चटके दिले, असह्य वेदना दिल्या तरी न खचलेल्या, डोळ्यातला आशावाद शाबूत ठेवणाऱ्या त्या ४ ते २० वयोगटातल्या मुली.
कुणी नकळत्या वयात वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ओढली गेलेली, कुणी नातेवाईकांकरवी विकली गेलेली, कुणी घरातील पुरुषांच्या वासनेला बळी पडलेली, कुणी लग्न न होता गर्भार राहिली म्हणून घरातून हाकलण्यात आलेली, कुणी पुरुषी अत्याचारांत पोळलेली, कुणी घरात मुलगी नको म्हणून अव्हेरलेली, कुणी कमी वयात मातृत्व स्वीकारावं लागलेली अशा विविध छळांनी आणि अन्यायांनी पीडित मुली या रेस्क्यू फाऊंडेशनच्या आसऱ्याने मोकळा श्वास घेत आहेत. प्रत्येकीवर झालेल्या अन्यायाला तर सीमाच नव्हती; पण त्यांना समाजातील काही मोजक्या लोकांनी ज्यांना सामाजिक कार्यात पुढे येऊन सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी आधार दिलाय. त्यापैकीच सकाळ माध्यम समूह आणि ओरियन मॉलचे सहकारी.
बाहुबली सिनेमाच्या आयोजनाने त्यांना त्या खास मुलींच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त हास्य आणि काही क्षण आनंदाचे त्यांच्या आयुष्यात निर्माण करायचे होते आणि यापुढेही त्या अशाच आनंदी राहाव्यात ही आस होती.

सकाळची सव्वादहाची वेळ. पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये रेस्क्यू फाऊंडेशनच्या मुली पोहोचल्या होत्या. मॉलमधल्या वातावरणाशी त्या सरावल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा सिनेमा बघतानाचा आनंद ओसंडून वाहत होता. त्या तुमच्या - आमच्यासारखेच सहज फिरायला जाते, असे म्हणून बाहेर पडू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास होता. रेस्क्यू फाऊंडेशन, सकाळ माध्यम समूह आणि ओरियन मॉलचे सहकारी यांच्यातील एक समान दुवा होत्या त्या ४० मुली. आणि त्यांची प्रामाणिक इच्छा होती मुलींच्या निरागस चेहऱ्यावर आनंद बघणं.
सिनेमा सुरू झाला तशी हळूहळू होणारी त्यांच्यातील चुळबूळ, कुजबूज थांबली आणि चेहऱ्यावर आता सिनेमात पुढे काय होणार, याविषयीचं कुतूहल दिसू लागलं. अमरेंद्र बाहुबलीची एंट्री झाली तेव्हा मुली भलत्याच खूष झाल्या आणि सिनेमा पाहण्यात दंग झाल्या. देवसेनेला पडद्यावर तलवारबाजी करताना पाहून त्यांनाही वाटलं असेल, आपणही अशी तळपती तलवार हाती घ्यावी आणि आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांचा समाचार घ्यावा. त्यांच्या मनात काय चालंलं असेल, तर असंख्य विचारांचं वादळ सुरू असेल. आपल्या भविष्याविषयी अजून तशी स्पष्ट कल्पना नाही, दिशा नाही तरी प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी त्या धडपडत असतील, चाचपडत असतील.

एकंदर त्या इतर सिनेरसिकांसारखाच सिनेमा पाहत होत्या; पण त्यातही वेगळेपण जाणवत होतं. कारण सिनेमात महिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना स्पर्श करणाऱ्या सेतुपतीला पाहून त्या क्षणभर स्तब्ध झाल्या होत्या. त्या वेळी त्यांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची जाणीव झाली असावी. मग त्यांना उत्सुकता लागून राहिली की पुढे काय होणार... मग भर दरबारात अमरेंद्र बाहुबलीने महिलांना त्रास देणाऱ्या त्या सेतुपतीचा तलवारीने गळा कापला तेव्हा मुलींनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. सिमेमागृहातून बाहेर पडताना प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एक मस्त कलाकृती पाहिल्याचं समाधान झळकलं होतं. काहींची पहिलीच वेळ होती थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची; तर काहींनी गेल्या काही महिन्यांत एकही सिनेमा पाहिला नव्हता.
सिनेमा संपल्यावर काही मुलींना बोलतं केलं तेव्हा सगळ्या जणींना त्या सिनेमाविषयी भरभरून बोलायचं होतं. सिनेमातल्या प्रत्येक दृश्यावर त्यांच्याकडे काहींना काही सांगण्यासारखं होतं; पण वेळच कमी पडला असता अशी परिस्थिती होती. काहींनी सांगितलं, अमरेंद्र बाहुबलीची एंट्री मस्त वाटली. काही म्हणाल्या, देवसेनाच लय भारी होती. एकीने सांगितलं, की पाठीवर भल्लालदेवाने मारलेला बाण लागला तरी आपल्या नातवाला वाचणारी शिवगामी आणि तिने ज्या प्रकारे त्याला आपल्या हातात वर उचलून धरलं ते आवडलं. मला वाटलं या प्रसंगातून तिला कदाचित वाटलं असेल, आपल्या घरच्यांनी मायेच्या माणसांनीही तिला असंच उचलावं. तिचं रक्षण करावं; पण ते प्रेमळ हात त्यांच्या मस्तकी नव्हते आणि हातात हात घेऊन वचन देणं तर दूरच राहिलं. चिमुकला महेंद्र बाहुबली आई देवसेनेच्या हातावर आपला इवलासा मऊसुत कोमल हात ठेवतो, तेव्हा या मुलींनाही आपल्या प्रियजनांची आठवण आली असेल.

काही जणी भावूक झाल्या होत्या; पण डोळ्यातली चमक त्यांनी हरवू दिली नाही; तर एक मुलगी म्हणाली, बाहुबली मरतानाच्या प्रसंगाने माझे डोळे दिपले, जेव्हा तो म्हणतो, मा का ध्यान रखना... इथली प्रत्येक मुलगी आपल्या घराला पारखी झाली असली तरी त्यांच्या घरच्यांविषयी मनात द्वेष नव्हता, हेच दिसून आलं. काही जणींना फक्त त्यांची नावं विचारली, तू कुठून आलीस असं विचारलं तेव्हा त्यांची नावं ऐकून माझ्याच त्या मैत्रिणी आहेत असं वाटलं. दोघी म्हणाल्या, आम्ही ओडिशातून आलोय. त्यातल्या एकीने तुझं नाव काय, या वाक्याचं तिच्या भाषेत चटकन भाषांतरही केलं. ती ओळ मी टिपून घेताना माझ्याकडून चूक झाली, तर लगेच तिने माझ्या डायरीत पाहून ती चूक सुधारली. इतक्या हुशार आणि चाणाक्ष मुली होत्या त्या. एक मुलगी संगणक प्रशिक्षण घेत होती. तिला ते आवडतही. काय काय शिकलीस त्यातलं? विचारल्यावर तिने एम एस ऑफीस, पॉवर पॉईंट, एम एस पेंट शिकले. अजून पुढे शिकायचं आहे. म्हणाली...
सगळ्या मुली उत्साहात होत्या. त्यांच्या नजरेत कुतूहल होतं. खूप काही शिकण्याची इच्छा दिसत होती. आपण आपल्या माणसांना गमावल्याचं दुःख तर होतंच. बोलताना भावूक झाल्या होत्या. एकीच्या डोळ्यात आसवं तरळली. ती तर नेपाळहून आली होती. घरच्यांची आठवण येत होतीच; पण त्यासोबत त्यांना त्या बोचऱ्या आठवणीही आठवत असणार... म्हणून अधूनमधून हरवल्यासारख्या दिसत होत्या. काही जणी अगदी बिनधास्त होत्या. हिंदी - मराठीमिश्रित आमचं बोलणं चाललं होतं. नेपाळ, बांगलादेश तसेच महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांतून आलेल्या या मुली गुण्यागोविंदानं एकत्र रेस्क्यू फाऊंडेशनच्या शेल्टर होममध्ये राहतायत. मला तर त्या सगळ्या जणी तडफदार, स्वतंत्र, करारी बाण्याच्या भावी देवसेनाच वाटल्या.
बाहुबली-२ सिनेमाच्या पटकथेच्या भाषेत सांगायचं, तर अमरेंद्र बाहुबली जसा देशाटनाला निघतो, तसा प्लॉट पॉईंट वनपर्यंतचा प्रवास या मुलींनी रेस्क्यू फाऊंडेशनच्या साथीने इथवर केलाय आणि इथून पुढचा प्रवास म्हणजेच इंटरव्हल, प्लॉट पॉईंट टू, क्लायमॅक्स आणि रेझोल्युशन सुंदर करणं ही आपली जबाबदारी आहे. कथेप्रमाणे बाहुबली देशाटनाला गेला नसता, तर पुढचा सिनेमा घडला नसता. अगदी तसंच या मुलींना त्यांचं आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी मदतीचा हात तर द्याच; पण त्यापेक्षाही तुम्ही त्यांच्या सोबत आहात, हा विश्वास द्या. आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्नही कराच...

खूप काही करायचे आहे...
बाळकृष्ण आचार्य यांनी स्थापन केलेल्या रेस्क्यू फाऊंडेशनची धुरा आता त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी पत्रकार त्रिवेणी आचार्य सांभाळत आहे. त्यांना साथ लाभलीय रेस्क्यू फाऊंडेशनचे प्रोजेक्ट डिरेक्टर दीपेश टांक यांची. फाऊंडेशनविषयी दीपेश म्हणाले, की आमच्या कांदिवलीच्या मुख्य कार्यालयात जवळपास ५० मुली आहेत आणि त्यांची वेश्यावस्तीतून सुखरूप सुटका केल्यावर आम्ही खास काळजी घेतो. त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. आमच्या शेल्टर होममधील काही मुली शाळेत शिकत आहेत. काहींना त्यांच्या पायावर उभं राहता येईल, यासाठी बेसिक कोर्सेस आखले आहेत. नुकत्याच जन्मलेल्या मुली ते २० वर्षे वयोगटापर्यंतच्या मुली येथे आहेत. जिथे भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्ती होतात. तिथे ह्युमन ट्रॅफिकिंग मोठ्या प्रमाणात होतं. कारण अशा आपत्तींमध्ये आई-वडील आपल्या मुलांना वाचवतात. हे दलाल नेमक्या याच वेळी मुलींच्या शोधात असतात. मुली दिसल्या की त्यांना तिथून पळवून नेलं जातं. वेश्या व्यवसायात कुठलीही मुलगी स्वच्छेने आलेली नसते. तिला जबरदस्तीने अशा ठिकाणी आणल्यावर ती जवळपास आठवडाभर सुटकेसाठी धडपड करते. मग तिच्या सगळ्या आशा संपतात आणि मग ती तिथल्या वातावरणाला सरावते. व्यसनांच्या आहारी जाते. या सगळ्या महिलांसाठी काम करायचं ठरवलं तेव्हाही आणि आताही जिथे कुठे आम्ही धाड टाकून महिलांना ताब्यात घेतो, तेव्हा जी त्यांची अवस्था असते ती पाहवत नाही. माणुसकीचा अंत झाल्याचा प्रत्यय आम्हाला वारंवार येतो. आपल्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या मुलींसाठी आम्हाला अजून खूप काही करायचं आहे; पण त्यासाठी सजग आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कणखर हातांची आवश्यकता आहे. ते आमच्यासोबत आमच्या कार्याला हातभार लावू शकतील.

Rescue Foundation
Plot No.39, Fatimadevi Road, Behind Our Lady of Remedy School, Poisur, Kandivali (W), Mumbai - 400067, Maharashtra, India. Telephone:- +91-22-28060707 / 28625240

पूर्वप्रसिद्धी सकाळ मुंबई आवृत्ती
No comments:
Post a Comment