“आनंद देत असता, आनंद घेत जावे” ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी विंदा करंदीकरांच्या
गझलेतील ही अतिशय सुंदर ओळ. आजपर्यंत साहित्याने मला दिलेल्या आनंदात पुरेपूर
भिजले.
पु.शि. रेगे यांच्या “सावित्री” कादंबरीच्या रूपात मला माझी जीवाभावाची सखी
भेटली.
इरावती कर्वेंच्या “परिपूर्ती” या पुस्तकातून
मला माझ्या आईच्या मायेची कूस मिळाली.
प्रकाश नारायण संतांच्या वनवास, शारदासंगीत, पंखा आणि झुंबर या कथासंग्रहातून मला लंपन भेटला. त्याने
आयुष्यभरासाठी नवी उमेद दिली, आपल्या सोबत इतरांचही जगणं कसं
आनंदाचं करावं, ही अनमोल भेट मला त्याने दिली. मीराबाई त्यांच्या
भजनात एके ठिकाणी असं म्हणतात की,
गली तो चारों ओर बंद पडी
म्हारो पियासे मिलन कैसे होय
तिच्या या प्रश्नाला उत्तर म्हणूनच की काय
संत कबीर त्यांच्या एका दोह्यात असं म्हणतात,
घूंघट का पट खोल री
तोहे पीव मिलेंगे…
अशा प्रकारे साहित्य वाचताना निर्माण झालेले प्रश्न पुढे साहित्यातूनच त्यांची
उत्तरे सापडत गेल्याने साहित्याचा अभ्यास माझ्यासाठी अभ्यास न राहता तो माझ्या स्वतःचा
शोध झाला आणि साहित्य सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी पुरेपूर आनंद घेऊन
आला.
आपलं मन पुष्पवाटिकेत
स्वच्छंदपणे बागडणाऱ्या फुलपाखरासारखं असतं. त्याला जपायला हवं…
कधी कधी असं होतं की आपण शाळेत गेल्यावर
शिक्षकांसमोर नुसतेच बसलेले असतो. मनाचा पक्षी मात्र केव्हाच बाहेरच्या मोकळ्या
वातावरणात उडून गेलेला असतो. शिक्षणाच्या बाबतीत मी काही वेळा
असाच अनुभव घेतला आहे. वर्गात शिकवल्या जाणाऱ्या आपल्या आवडीच्या
विषयामुळे आणि शिक्षकांच्या रंगून जाऊन शिकवण्यामुळे मन एकाग्र व्हायचं… नाहीतर
मनाचं भटकणं सुरुच असायचं. म्हणूनच शिक्षणापेक्षा इतर गोष्टींचीच (म्हणजे
चांगल्या क्रिएटिव्ह गोष्टींची) गोडी अधिक वाटू लागली...
निसर्गाची साथ आहे, ग्रंथांचा सहवास आहे, थोडेसे शब्द आहेत, थोडेसे रंग आहेत, थोडेसे गाणे आहे, थोडेसे कलाकौशल्य आहे, कल्पनेने भारून जायला स्वप्नांचा विस्तीर्ण कॅनव्हास आहे, फक्त तू नाहीस…
एखादी गोष्ट लहानपणापासून मनावर कोरली गेली, की ती विसरावी म्हटलं तरी विसरता येत नाही. मग ती गोष्ट आनंदाची असो वा दुःखाची किंवा अर्थ लावता येत नाही म्हणून आयुष्याला वळण देणारी घटना, असच आपण तिचं वर्णन करू शकतो. अशीच एक घटना माझ्या बाबतीत घडली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. माझ्या आयुष्यात घडलेली ती घटना चांगली की वाईट, गमतीशीर की गंभीर याचा संदर्भ मला अजून लागलेला नाही. परंतु चित्रपट पटकथेच्या भाषेत बोलायचं तर ती एक कारक घटना होती. तीच माध्यमांच्या जगात मला नेणारी घटना होती. म्हटलं तर जाणिवपूर्वक लक्षात ठेवण्यासारखी, नाहीतर प्लॉट पॉईंट वनला पूरक ठरणारी… पण माझ्या मनावर ती घटना खोलवर रूजलेली आहे... या गोष्टीचा मध्यांतर जवळ आला आहे...प्लॉट पॉईंट टू, क्लायमॅक्स आणि resolution याचाही अर्थ लागतो आहे...त्या घटनेची परिपूर्ण गोष्ट लवकरच पूर्ण होईल असं वाटू लागलंय...
bhakti khup chan lihilalat vachun kas man bharaun gele.
ReplyDelete