सकाळची वेळ आहे, आपण पाहतोय की कुलकर्णी फॅमिली पिकनिकला जाण्याची तयारी करत
आहेत. गडबडीत आहेत.
अपूर्वाचे आई-बाबा बॅगा भरणं. नाश्ता, गाडीत खाण्यासाठी डबा भरणं यात बिझी
आहेत. अपूर्वाची आई स्वयंपाकाच्या खोलीत काम करता करता अपूर्वाला हाक मारतेय.
त्यांच्या स्वयंपाक घराच्या पुढे असलेल्या भागात बाल्कनी आहे. तिथे काही फुलझाडांच्या
कुंड्या आहेत. त्यात प्रामुख्याने सदाफुलीची व्हाईट आणि पर्पल रंगाची रोपटी आहेत.
अजून इतर दोन तीन प्रकारची फुलझाडेही असू शकतात. किंवा सगळी सदाफुलीची असली तरी
चालेल. अपूर्वा त्या फुलांच्या रोपट्यांना पाणी घालतेय. ती स्वतः कपडे घालून तयार
झालीय. पण तितक्यात तिला झाडांना पाणी घालायची आठवण होते. म्हणून तसेच चांगले कपडे
घातलेले असतानाही ती तिथे झाडांना पाणी घालायला येते. आधी बाल्कनीत आपल्याला दिसतं
की कुणीतरी झाडांना झारीनं पाणी घालतंय. हळुहळु तिचे हात दिसतात. मग एकदा ती
लांबून आपल्याला पाठमोरी दिसते. तितक्यात अपूर्वाची आई तिला तिकडून हाक मारतेय... अप्पू...
अपूर्वा अपूर्वा...
अपूर्वा म्हणते... हो गं मम्मे...आले आले...
मग आपल्याला अपूर्वाचा पूर्ण चेहरा पहिल्यांदाच दिसतो.
अपूर्वाचं तोपर्यंत पाणी घालणं पूर्ण झालेलं असतं. ती स्वयंपाक घरात येते.
काय गं किती उशीर...चल नाश्ता करून घे. आपल्याला निघायचय ना...
हो गं मम्मे....अगं मी उशीरा उठले. त्याची सजा बिचाऱ्या माझ्या झाडांना
का...पाणी घालायला नको का...आता आपण बाहेर चाललोय ना...मग त्यांना पाणी कोण
घालणार...
आई म्हणते...बरं बरं चल बस पटकन... बाजूच्या काकूंना सांगूया आपण...
त्यानंतर मग ते नाश्ता करतात. सगळी आवराआवर करून घरातून रेल्वेस्टेशनला
येण्यासाठी निघतात...
No comments:
Post a Comment