आंब्या-फणसाच्ये, काजी-करवंदाच्ये दीस जवळ इले तशे आजी
म्हनाक लागली,
बायग्या गो
बायग्या! मिया काजीचे पातेतलो पतेरो झाडूक आवाटातल्या दोघींका बोलावलय. ती
उद्यापासून येतली हत पतेरो झाडूक. काजी काढताना तरास होता कामा नये म्हनान
दरवर्साक अशी पातेची झाडलोट करुची लागता. तू वायच पातेत जा आनि नदार टाकून ये
झाडापेडांवर. म्होऊर इलो काय बघून ये.
माज्या आजयेन माका खयचा काम सांगल्यान
नी मी आयकाक नाय असा कदी झाला नाय. तीना सांगल्याबरोबर मिया पातेत फिरता फिरता खय
शेळकुंडा गावली तर ती हाडूक बारकी टोपली घेतलय, न्हानयेत घालूक थोडीशी शिरपूटा हानूसाठी कोयतो पन घेतलय आनि घराकडसून
उबी चढन चढत पातेत गेलय…. आनि बघतय तर काय! काजीची झाडा म्होवरान भरान गेलेली. नया
न्हवरेसारकी नटलेली दिसत होती. म्होवराचो घमघमाट सूऽऽऽर करुन नाकात भरुन घेतलय.
ताजीतवानी पाता बघून मन भरान गेला. बारीक बारीक हिरयीगार करवंदा दिसली. फनसाच्यो
कुवऱ्यो,
आंब्याच्या
कलमांचो थाट काय विचारुच नुको.
कुड्याच्या पानांची खोलपी करुन थोडी
करवंदा काढलय चटनेसाठी,
फनसाच्यो चार
कुवऱ्यो काढलय फूस भाजयेसाठी. कोयत्यान आतेमेरेची सुकी लाकडा बारीक केलय, त्येंचो भारो बांधलय. सात-आठ शेळकुंडा
गावली ती टोपलेत भरलय आनि मिया पातेतसून खाली उतराक लागलय तर रडन्याचो आवाज कानार
पडलो. पैल्यांदा भीती वाटली पन सावारलय पाटकन आनि आवाजाच्या दिशेन जावन बघलय तर
गावड्यांची आजी त्येंच्या पातेत काजीच्या झाडाखाली बसान रडा होती. मिया जवळ जावन
तिका इच्यारलय,
अगे आजये रडतं
कित्याक,
काय झाला? तुमची पाता तर चांगली फुल्ली आसा. मग
रडाक काय झाला?
पायाबुडी फुरसा
सरसरला की काय?
अगो नाय गो
बायग्या,
माज्या
मुबैंच्या नातवान नाना सावतांकडे चिटी पाठवल्यान आसा. अगे मग त्यात काय
रडण्यासारक्या. सगळ्यांची खुशाली कळवल्यान ना त्येना. अगो खुशाली कसली इच्यारतस
बायग्या,
नातवान चिटयेत
लिवल्यान आसा ही पाता त्येका इकूची आसा म्हनान. आता सांग रडा नको तर काय करु मिया.
आपन आपल्या झिला – नातवंडांसाठी जमनीचो तुकडो राखान राखान ठेवचो आनि ह्येंनी तो
इकून टाकूचो. ह्यो कसलो न्याय?
गावड्यांच्या आजयेक कसाबसा समजावलय
आनि पातेतसून त्येंच्या घराकडे हानून सोडलय. नी मिया आमच्या घराकडेन इलय. आमची आजी
खळ्याच्या पेळेवर उबी ऱ्हवान माज्या वाटेकडे बघित होती. माका पातेतसून येवक उशीर
झालो. आनि मिया कसलोतरी इच्यार करीत हळुहळु चलतय. ह्या बघून आजयेन इच्यारल्यान, काय गो बायग्या उशीर कसो झालो तुका? तर मिया तिका गावड्यांच्या आजयेची
गजाल सांगलय. तशी मग आजी गप झाली. पन थोड्या येळान परत बोलाक लागली… अगो बायग्या
समुंद्राकडच्यो जमनी शिरीमंत लोकांनी हाटेला नि बंगले बांधाक बळकावल्यानी.
माळावरच्यो चांगल्यो जमनी कसल्या कसल्या प्रकल्पांका गेल्यो. आनि त्येच्यातना ज्यो
जमनी ऱ्हवल्यो त्यातल्यो रस्त्यांका आनि कोकन रेल्वेच्या रूळाखाली गेल्यो. येवढा
सगळा होवन जे जमनीच्ये तुकडे शिल्लक आसत ते आता आमच्यासाठी सोन्याच्ये तुकडे आसत.
अगो म्हनानच ती गावड्यांची आजी रडत होती. कळला तुका बायग्या! आजयेचा बोलना आयकान
आमची म्होवारलली काजीची पाता रातभर माझ्या सोप्नात येत होती. आजयेक आनि माका
इच्यारलास तर आमची पाता,
आमच्यासाठी
जमिन नाय तर ‘सोन्याचो तुकडो’ आसा. माका वाटता परत्येकाक ह्या सोन्याच्या
तुकड्याचा मॉल कळाक व्हया…
(हा ललित लेख मालवणी बोलीत लिहिलेला आहे.)
खूप छान
ReplyDeleteमी हे whatsapp वर शेअर केले तर चालेल का?
अनिरुद्ध गावडे
खूप छान
ReplyDeleteमी हे whatsapp वर शेअर केले तर चालेल का?
अनिरुद्ध गावडे